रोटरी क्लब तर्फे उभादांडा सागरेश्वर समुद्रकिनारी उभारला जातोय रेस्क्यू टॉवर…

मान्यवरांच्या उपस्थितीत आज झाले भूमिपूजन..

वेंगुर्ले : दाजी नाईक

रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला तर्फे उभादांडा सागरेश्वर समुद्रकिनारी रेस्क्यू टॉवर उभारला जातोय. या उपक्रमाचे आज मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी वेंगुर्ला नगराध्यक्ष श्री दिलीप गिरप, उभादांडा सरपंच श्री निलेश चमणकर तसेच रोटरी वेंगुर्ला प्रेसिडंट रो आनंद बोवलेकर, सेक्रेटरी रो डॉ राजेश्वर उबाळे, ट्रेजरर रो अनमोल गिरप, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी रो राजेश घाटवळ यांच्या सह अन्य रोटरी सदस्य उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रेजिडेंट व सेक्रेटरी यांनी या टॉवर ची आवश्यकता व होणारे फायदे उपस्थिताना समजाऊन सांगितले. भविष्यात सागरेश्वर समुद्रकिनाऱ्या लगतच्या परिसरात समुद्रात बुडून होणाऱ्या दुर्घटना टाळणे हा आपला मुख्य उद्देश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी रोटरी वेंगुर्ला चे माजी अध्यक्ष रो राजू वजराटकर, रो पंकज शिरसाट, रो डॉ वसंतराव पाटोळे, रो दिलीप शितोळे आदी रोटेरियन्स उपस्थित होते.

दरम्यान पर्यटक ,नागरिक व मत्स्यव्यावसायिक यांच्या जीवितसंर‌क्षणाच्यादृष्टीने अत्यंत महत्वपुर्ण असणा- या या रोटरी प्रोजेक्टसाठी , रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर अरूण भंडारे यानी रूपये २५,०००/- ची रोटरी डिस्ट्रिक्ट ग्रॅंट मंजूर केली आहे.