आचरा-अर्जुन बापर्डेकर :
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे* आयोजित इयत्ता 8 वी एनएमएमएस राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत
न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आचरा च्या नऊ विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होऊन घवघवीत यश संपादन केले.यात पेडणेकर वैष्णवी शंकर तळवडकर स्वरा नित्यानंद ,म्हमाणे आविष्कार अमोल भोसले कौशल माधवराव ,मांजरेकर आयुष संतोष खोत दिव्या किशोर,साटम गौरी विशाल कृत्तिका शिवराम आईर या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचे धी आचरा पीपल्स असोसिएशन संचलित मुंबई चे सर्व पदाधिकारी, शालेय समिती चे सर्व सदस्य मुख्याध्यापक , शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.










