मसुरे | झुंजार पेडणेकर : बांदिवडे येथे बांदिवडे ग्रामस्थ संघाच्या’ वतीने शिवजयंती निमित्त विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. महाराजांच्या प्रतिमेची ब्राह्मणांच्या उपस्थितीत मंत्रपुष्पांजलीने प्रतिष्ठापना करण्यात आली. गावातून काढण्यात आलेल्या मोटरसायकल रॅलीमध्ये गावातील सर्व युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन कार्यक्रमात नवचैतन्य निर्माण केले.
विविध स्पर्धांचा निकाल
पुढील प्रमाणे आहे. रांगोळी स्पर्धेत:
प्रथम क्रमांक कु. प्रांजल सतीश आईर,
द्वितीय क्रमांक सौ. अनुष्का आनंद परब,
तृतीय क्रमांक: कु. पूजा सतीश आईर.
वकृत्व स्पर्धा (लहान गट):
प्रथम क्रमांक कु. हर्ष दीपक घाडी,
द्वितीय क्रमांक कार्तिकेय गोपाळ परब,
तृतीय क्रमांक कु. रिद्धी मिलेश पवार,
उत्तेजनार्थ: कु. विहीत राम निमकर आणि कृतिका विकास घाडी यांना बक्षिसे देण्यात आली.
मोठ्या गट प्रथम क्रमांक: कु. प्रांजल सतीश आईर,
द्वितीय क्रमांक: रूद्र तुषार परब,
तृतीय क्रमांक: कु. प्रणव निलेश पवार,
तसेच अंगणवाडीतून कु. शविल दिनेश परब आणि कु. तनिष्का दिनेश परब यांनी सहभाग घेतला.
यानंतर अंगणवाडी ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा नं. १ च्या मुलांनी ‘न्याय शिवरायांचा’ ही मूकनाटिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली. महिला वर्गाच्या वतीने महाराजांच्या चरणापाशी ३९४ पणत्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात परीक्षक म्हणून श्री. निमकर सर, श्री. हजारे सर आणि सौ. महाले मॅडम यांनी काम पाहिले. कार्यक्रमात सहभागी झालेल्या अंगणवाडी, पालेवाडी, जि.प. शाळा नं. १ आणि २ च्या शिक्षकांचा सत्कार करून बांदिवडे ग्रामस्थ संघाच्या वतीने शाळांना बक्षिसे देण्यात आली.
यावेळी आनंद परब, प्रफुल्ल प्रभू, उदय सावंत, विलास परब, अजय घाडी, शंकर आईर, सतीश आईर, सत्यवान परब, किरण पवार, प्रकाश मेस्त्री, रमेश मेस्त्री, प्रशांत परब, सुनील घाडी, संदीप घडीगावकर, प्रकाश घडीगावकर, दिनेश परब इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार रामचंद्र माळकर यांनी मानले.












