केंद्रीय अर्थसंकल्प ‘प्रचार प्रसार अभियानांतर्गत’ उद्या सावंतवाडीत व्याख्यान

सावंतवाडी । प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र आणि भाजपा कामगार मोर्चाच्या वतीने ‘केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७’ च्या जनजागृतीसाठी विशेष ‘प्रचार प्रसार अभियान’ आयोजित करण्यात आले आहे. हे अभियान उद्या, ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता सावंतवाडी येथील शिवाजी चौक, पाटील टॉवर येथे पार पडणार आहे.

या कार्यक्रमात ‘कामगार, कष्टकरी आणि जनतेसाठी अर्थसंकल्पात काय आहे?’ तसेच ‘कोकण-सिंधुदुर्गसाठी काय?’ या विषयावर सविस्तर चर्चा केली जाणार आहे. भाजपा कामगार मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश संघटन सरचिटणीस श्री. हनुमंत लांडगे हे या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

यावेळी व्यासपीठावर कामगार मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्री. अशोक राणे, माजी नगराध्यक्ष श्री. प्रेमानंद साळगांवकर आणि मा. जिल्हा परिषद सदस्य श्री. प्रमोद कामत हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन कोकण प्रभारी तथा भाजपा कामगार मोर्चाचे उपाध्यक्ष श्री. नारायण गुणाजी सावंत यांनी केले आहे.

तरी या व्याख्यान व प्रचार अभियानास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नारायण सावंत यांनी केले आहे.