रेणूका प्रतिष्ठान तर्फे प्लास्टिक हटाव अभियान

रत्नागिरी : रेणूका प्रतिष्ठान व राष्ट्र सेविका समिति तर्फे प्लास्टिक हटाव उपक्रम राबवला जात आहे. बुधवार दि. २५ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी मारुती मंदिर परिसरात स्टेडियम मागचे भाजी मार्केट मध्ये कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.

तिथे येणाऱ्या गृहिणींनी हा उपक्रम अतिशय स्तुत्य असल्याचे सांगितले. शिवाय भाजी विक्रेत्यांनी ही गिऱ्हाईकांना कापडी पिशवी वापरण्यासाठी प्रोत्साहित केले.
ज्यांनी पिशवी आणली होती त्यांचे रेणुका प्रतिष्ठान रत्नागिरी ची पिशवी भेट देउन कौतुक केले,तर ज्यांनी आणली नव्हती त्यांना कापडी पिशवी भेट देऊन नेहमी कापडी पिशवी वापरण्याची विनंती केली.

या उपक्रमात रेणूका प्रतिष्ठान रत्नागिरी च्या अध्यक्षा सौ. दीपाताई पाटकर व राष्ट्र सेविका समिति च्या सेविकांनी भाग घेतला.