सिं .शि .प्र.मं .अभियांत्रिकी महाविद्यालय, कणकवली येथे दि.24,25 फेब्रुवारी या दोन दिवसीय मानसिक आरोग्य कार्यशाळा व समुपदेशन सत्राचे आयोजन

“धरीं रे मन संगती सज्जनाची । जेणें वृत्ति हे पालटे दुर्जनाची” । या उक्ती प्रमाने विद्यार्थी जीवनात बिघडत चाललेले मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना यांचेमार्फत दोन दिवसीय मानसिक आरोग्य कार्यशाळाआयोजित करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात कॉलेजच्या मुख्य प्रांगणात असलेल्या छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून कॉलेजचे प्राचार्य मा.श्री.डॉ.डी.एस.बाडकर सर तसेच कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मानसशास्त्र तज्ञ व जिल्हा समन्वयक ,संवेदना प्रकल्प सिंधुदुर्ग श्री. अजय साठे उपस्थित होते. नंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले.या कार्यशाळेचे प्रमुख व मार्गदर्शक श्री. अजय साठे यांनी विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्याचे महत्त्व, ताणतणाव व्यवस्थापन, भावनिक संतुलन, नैराश्याची लक्षणे आणि योग्य वेळी समुपदेशन घेण्याची गरज याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

आजच्या स्पर्धात्मक व तणावपूर्ण शैक्षणिक वातावरणात मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते, असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचे आणि अडचणीच्या प्रसंगी तज्ज्ञांचा सल्ला घेण्याचे आवाहन केले. सत्रादरम्यान विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध प्रश्न विचारून शंका निरसन करून घेतले.२४ फेब्रुवारी रोजी प्रथम व द्वितीय वर्ष अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी, तर दि. २५ फेब्रुवारी रोजी तृतीय व अंतिम वर्ष विद्यार्थ्यांसाठी हे सत्र आयोजित करण्यात आले होते.

हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महाविद्यालयाचे संस्थापक मा. खा. नारायणरावजी राणे, अध्यक्षा मा. सौ. निलम ताई राणे, उपाध्यक्ष मा. आ. निलेशजी राणे, सचिव मा. ना. नितेशजी राणे, मा.प्राचार्य डॉ.डी.एस.बाडकर सर,यांचे बहुमूल्य असे मार्गदर्शन लाभले.यावेळी एस. एस. पी. एम. अभियांत्रिकी महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, राष्ट्रीय सेवा योजना प्रकल्प अधिकारी प्रा.अरविंद कुडतरकर सर, डॉ.शुभांगी माने मॅडम, सचिव श्री वैभव यादव सर, श्री शेखर नाईक सर, एन एस एस विद्यार्थी प्रतिनिधी कु.भार्गवी कवठकर,कु.जिगिशा म्हापसेकर, कु.तुकाराम नाईक,कु.साईश कोचरेकर, कु.परशुराम काळे,समूह प्रमुख राजलक्ष्मी गिरप,कु. पूर्वा पेडणेकर, कु.आस्था पेडणेकर कु.साक्षी दळवी, महाविद्यालयातील सर्व शिक्षक, कर्मचारी,राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक तसेच विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.