नांदगाव | प्रतिनिधी : कणकवली तालुक्यातील असलदे गावामध्ये स्वतंत्र तलाठी कार्यालय मंजूर झाले असून या इमारतीचे उद्घाटन समारंभ सोमवार दिनांक 26 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता ग्रामपंचायत असलदे येथे कणकवली तहसीलदार अजय पवार यांच्या हस्ते होणार आहे यावेळी नांदगाव मंडल अधिकारी विद्या जाधव तलाठी लुडबे,असलेले सरपंच पंढरी वांगणकर, नवनिर्वाचित सरपंच चंद्रकांत डामरे ,उपसरपंच संतोष परब ,सोसायटी चेअरमन भगवान लोके, व्हाईस चेअरमन दयानंद हडकर,माझी चेअरमन प्रकाश परब, पोलीस पाटील सावित्री पाताडे,तंटामुक्ती अध्यक्ष बाबाजी शिंदे ,ग्रामसेवक आर.डी .सावंत तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी आदी उपस्थित राहणार आहेत.
असलदे गावामध्ये स्वतंत्र तलाठी कार्यालय मंजूर होण्यासाठी कणकवली देवगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी विशेष प्रयत्न केले होते .ते प्रयत्न आज सत्यात उतरले आहेत. स्वतंत्र तलाठी कार्यालय झाल्याने येथील गावातील लोकांना सातबारा आठ व इतर सुविधा उपलब्ध होणार असून या सोमवारी होणाऱ्या उद्घाटन सोहळ्याला गावातील सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन असलदे सरपंच पंढरी वायंगणकर यांनी केले आहे