वाटद सुतारवाडी येथील गावनदीत बुडालेल्या ओंकारचा दोन दिवसांनी सापडला मृतदेह

रत्नागिरी ः प्रतिनिधी : तालुक्यातील वाटद सुतारवाडी येथील नदीत बुधवारी दुपारी बुडालेल्या कोल्हापूर येथील ओंकार सुभाष जाधव (22,रा.कोल्हापूर) याचा मृतदेह शुक्रवार 28 ज्ाुलै रोजी सकाळच्या सुमारास तो पाण्यात बेपत्ता झालेल्या ठिकाणापासून काही अंतरावर मिळून आला.
बुधवारी दुपारी जयगड पंचक्रोशितील जिंदाल पोर्ट कंपनरीच्या सेब ठेकेदाराकडे काम करणारे उत्तर प्रदेश मधील विक्रम नरेशचंद्र सिंग (34),केरळचा विनिश गोपाळ नायर (35) आणि ओंकार जाधव हे तिघेही वाटद सुतारवाडी येथील नदीवर पोहण्यासाठी गेले होते.अचानपणे पाण्याचा जोर वाढल्याने तिघेही पाण्यात वाहून जाउ लागले.त्यांचा आरडो-ओरडा ऐकून तेथील ग्रामस्थांनी पाण्यात उड्या मारुन बुडणार्‍या तिघांना वाचवण्याचा प्रयत्न केला.पण यातील विक्रचा बुडून मृत्यू झाला तर विनिश नायरला वाचवण्यात यश आले होते.परंतू,ओंकार जाधव पाण्यात बेपत्ता झाला होता.गुरुवारी दिवसभर त्याचा जयगड पोलिस आणि ग्रामस्थ शोध घेत होते.अखेर शुक्रवारी सकाळी त्याचाही मृतदेह मिळून आला.याप्रकरणी जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.