कळबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल
खेड(प्रतिनिधी) खेड तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल देवघर निवाची वाडी विद्यालयातील ४ विद्यार्थ्यां अचानक चक्कर येवून बेशुद्ध पडल्याने रुणालयात दाखल करण्यात आले आहे, हा प्रकार गुरुवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास घडला
युवराज सुधीर यादव इयत्ता आठवी गाव देवघर हा विद्यालयात चक्कर येऊन बेशुद्ध पडला होता त्याला एका खाजगी वाहनाने तळे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी पाठवण्यात आले त्याच दरम्यान या विद्यालय मधील सिद्धी गणेश पवार(१३) इयत्ता आठवी राहणार जैतापूर मोहिनी रवींद्र पवार वय १३ इयत्ता आठवी राहणार मांडवे, निधी गजानन जाधव वय १५ इयत्ता दहावी राहणार रसाळगड यांना देखील अचानक चक्कर येऊन अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तळे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र तेथे वैद्यकीय अधिकारी नसल्याने तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांनी कळंबनी उपजिल्हा रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला
त्यानुसार त्यांना नेण्यासाठी तेथे उभी असलेली रुग्णवाहिकेची मागणी मुख्याध्यापकांनी केली मात्र चालक नसल्याचे कारण देण्यात आले त्यानंतर ही बाब त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या निदर्शनास येतात त्यांनी याबाबत जाब विचारून रुग्णवाहिकेबाबत तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करतो असे सांगितल्यावर दवाखान्यात आराम करत असलेला चालक तात्काळ दाखल होऊन त्या तीन विद्यार्थिनींना कळंबनी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले
दरम्यान युवराज यादव या विद्यार्थ्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यास घरी सोडण्यात आले तर तीन विद्यार्थिनींवर कळ बणी उपजिल्हा रुग्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत एकाच वेळी चार विद्यार्थ्यांना अचानक चक्कर येण्याचा प्रकार यामागचे कारण अद्यापि समजू शकले नाही











