कणकवली : तहसीलदार कार्यालय, कणकवली शुक्रवारी सकाळी ११.३० वा. संजय गांधी निराधार योजना समितीची सभा पार पडली. या सभेत विविध योजनांतील एकूण ६४ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली.
सभेला समितीचे अध्यक्ष शरद कर्ले, सदस्य सचिव तथा तहसीलदार दीक्षित देशपांडे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, नायब तहसीलदार गंगाराम एम. कोकरे यांच्यासह समिती सदस्य सुजाता हळदीदे, विजय कालसुलकर, भगवान दळवी, गुरुनाथ वर्देकर, गजानन शिंदे तसेच संजय गांधी शाखेचे कर्मचारी उपस्थित होते.
सभेमध्ये संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत ४२ प्रकरणे, श्रावणबाळ राज्य सेवा निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत १९ प्रकरणे तर इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत ३ अशा एकूण ६४ लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ मंजूर करून देण्यात आला आहे.












