आडवली येथे ​20 रोजी श्री स्वामी समर्थ जयंती उत्सव सोहळा!

​मसुरे | झुंजार पेडणेकर
​ समर्थ गड – आडवली येथील श्री स्वामी समर्थ मठात 20 मार्च रोजी श्री स्वामी समर्थ जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. ​मठातर्फे आयोजित विविध धार्मिक कार्यक्रम पुढील प्रमाणे आहेत.
​सकाळी ६ ते ९ विधिवत पूजा,​सकाळी ९ नंतर भक्तांना दर्शन,
​दुपारी १२:३० वाजता महाआरती, ​दुपारी १ वाजता महाप्रसाद,
​दुपारी ३ ते ८ हळदीकुंकू समारंभ,
​रात्री ८ ते ८.३० महाआरती,
​रात्री ९ वाजता स्थानिक सुस्वर भजने.
​ सर्व भाविकांनी या मंगल प्रसंगी उपस्थित राहून स्वामींच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. सुनील शांताराम घाडीगावकर (श्री. भाई महाराज) आणि मठातर्फे करण्यात आले आहे.