शिरोडा येथील मालिनी अमरे चे ‘मिस ग्लोबल इंडिया’ स्पर्धेत यश ..

फर्स्ट रनर अपचा पटकावला मान…

वेंगुर्ले l प्रतिनिधी :पुणे, पिंपरी-चिंचवड येथे नुकत्याच झालेल्या ‘कशिश प्रोडक्शन मिस ग्लोबल इंडिया’ सौंदर्य स्पर्धेत शिरोडा वेळागर येथील मालिनी मदन अमरे हिने ‘फर्स्ट रनर अप’ चा मान पटकावला आहे. कशिश प्रोडक्शनचे आयोजक योगेश पवार यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. यावेळी अंतिम फेरीत दमदार कामगिरी करत, मालिनीने कोकणचा गौरव वाढवला आहे. तिच्या या यशामुळे सर्वच स्तरातून तिचे अभिनंदन होत आहे.

यापूर्वीही तिने सौंदर्य स्पर्धांमध्ये आपले कौशल्य सिद्ध केले आहे. ‘द रॉयल पेजेंट मिस महाराष्ट्र २०२४’ आणि ‘महाराष्ट्राची सौंदर्यवती २०२४’ यांसारख्या स्पर्धांमध्येही तिने यश मिळवले आहे.