मध्यरात्री मालवण महसूल पथकाची धडक कारवाई

तोंडवळी येथे अनधिकृत वाळू वाहतूक करणारे तीन डंपर पकडले

मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील तोंडवळी येथे शनिवारी मध्यरात्री मालवण महसूल विभागाच्या पथकाने धडक करावाई करतं वाळूची अनधिकृतपणे वाहतूक करणारे तीन डंपर पकडले. हे तिन्ही डंपर ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी मालवण तहसील कार्यालयाच्या आवारात आणून ठेवले आहेत.

या कारवाईत डंपर क्र-GA-08-U-9918, क्र GA-O5-T-6656, क्र. GA-06-T-0639 हे तीन डंपर पकडण्यात आले. मालवण तहसिलदार गणेश लव्‍हे यांच्‍या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाचे मंडळ अधिकारी उमेश सिंगनाथ, मंडळ अधिकारी स्‍वप्‍नल जंगले, ग्राम महसूल अधिकारी आकाश कऱ्हाळे, ग्राम महसूल अधिकारी प्रकाश गायकवाड, ग्राम महसूल अधिकारी मौसमी शिरसाट, वाहन चालक भारत सिंगनाथ, पोलीस विभागाचे कर्मचारी यांनी ही कारवाई केली.