वेंगुर्ले येथे ५ ऑगस्ट रोजी आयोजन
वेंगुर्ले : प्रतिनिधी : मल्टी स्किल रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर, सिंधुदुर्ग या संस्थेच्या माध्यमातून शनिवार दिनांक ५ ऑगस्ट रोजी वेंगुर्लेत सिद्धीविनायक हाॅल मध्ये “स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन कार्यशाळा व तलाठी भरती मार्गदर्शन शिबीर” आयोजित करण्यात आले आहे. या कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणून किर्ती महाविद्यालयात, मुंबई चे समाजकार्य अभ्यासक्रमाचे प्रथितयश प्राध्यापक व समन्वयक प्रा. अमेय सुनील महाजन हे मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या हस्ते होण्यासाठी मल्टी स्किल रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर , सिंधुदुर्ग संस्थेचे अध्यक्ष विजय रेडकर व प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांनी त्यांना निमंत्रित केले आहे.











