शिरोडा येथील पूर्ण प्राथमिक खर्डेवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांकडून व्यसनमुक्ती जनजागृती पर “पथनाट्य” 

वेंगुर्ले l दाजी नाईक :जि.प.समाज कल्याण विभाग सिंधुदुर्ग व नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य आयोजित नशामुक्त भारत अभियानांतर्गत “व्यसनमुक्त गड किल्ले संवर्धन” मोहिमेचा शुभारंभ शनिवारी किल्ला यशवंतगड, रेडी या ठिकाणी झाला. याप्रसंगी शिरोडा येथील “पूर्ण प्राथमिक शाळा खर्डेवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी सुंदर असे व्यसनमुक्ती जनजागृती पर “पथनाट्य” सादर केले. त्यांच्या या कलेचे सर्वांनी कौतुक करून मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन त्यांच्या जनजागृती पर कलेचा गौरव केला.

यावेळी श्री.वासुदेव नाईक (गटविकास अधिकारी, वेंगुर्ले) श्री.निसर्ग ओतारी (पोलीस निरीक्षक वेंगुर्ले), श्री.रामसिंग राणे (सरपंच,रेडी) तसेच अन्य मान्यवर, परिसरातील दुर्गप्रेमीसह, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, स्थानिक नागरिक उपस्थित होते.

पथनाट्यात शिक्षक श्रीम. अश्विनी सोरेकर, श्री. सुनिल वाघ यांच्यासह समर्थ वाघ, मानस साळगावकर, परी कांबळी, अदिती कांबळी, लक्षिता पटवेकर, साक्षी मोरे, पूर्वा मोरे, दिक्षा अणसूरकर, मनस्वी अणसुरकर या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शाळा व्यवस्थापन समितीनेही या पथनाट्याचे कौतुक केले आहे.