खासदारांच्या प्रयत्नांनी पहिला व दुसऱ्या टप्प्यात किल्ले मंडणगडच्या पर्यटन विकासाकरिता एकूण 2 कोटी 60 लाखांच्या भारघोष निधीमुळे येथील पर्यटन विकासाला चालना मिळणार.
मंडणगड l प्रतिनिधी – किल्ले मंडणगडचे पर्यटन विकासाकरिता रायगड – रत्नागिरी लोकसभा क्षेत्राचे खासदार श्री. सुनील तटकरे यांच्या प्रयत्नामुळे 1 कोटी 10 लाखांचा निधी मंजुर झाला आहे. या संदर्भात 11 फेब्रुवारी 2024 रोजी श्रीवर्धन येथे आयोजीत करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत खासदार सुनील तटकरे यांनी ही माहीती दिली. मंडणगड येथील नवयुवक तरुण मंडळाच्या वतीने किल्ल्याचे पर्यटन विकासाकरिता निधीची मागणी नगरपंचायत मंडणगड यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानुसार बांधकाम सभापती सौ. प्रियांका लेंडे व माजी बांधकाम सभापती दीनेश लेंडे यांनी खासदार सुनील तटकरे यांच्याकडे किल्ल्याच्या पर्यटन विकासाकरिता सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे खासदार श्री. तटकरे यांच्या प्रयत्नांमुळे पहिल्या टप्प्यात १ कोटी ५० लाख निधी नगरपंचायतीस प्राप्त झाला आहे, तर आता १ कोटी १० लाख निधी मंजूर झाला आहे.
किल्ले मंडणगडच्या पर्यटन विकासाकरिता एकूण 2 कोटी 60 लाख एव्हडा भारघोष निधी प्राप्त झाल्याने येथील पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. यामध्ये रस्ता, संरक्षक भिंती, मंदीर परिसर सुशोभीकरण, तलाव शुशोभीकरण, पथदिवे आदी कामे प्रस्तावीत करण्यात आली आहेत. यावेळी बोलताना श्री. तटकरे म्हणाले की, किल्ले मंडणगडला भुतकाळातील अनेक ऐतिहासीक संदर्भ लाभले आहेत. इतिहासाच्या पाऊलखूणा जपताना येथे पर्यटन विकासाचा मार्ग प्रशस्त व्हावा या उद्देशाने नगरपंचायत मंडणगड यांनी दूरदृष्टीने कामास सुरुवात केली व त्याला बळ देण्यासाठी येथे पर्यटकांसाठी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासनाकडे पाठपुरावा करुन नगरपंचायतीने सूचीत केलेल्या कामांना निधी उपलब्ध करुन दिला आहे. किल्ल्याच्या पर्यटन विकास करताना स्थानिक पातळीवर रोजगार व स्वयंरोजगार वाढीस अग्रक्रम दिलेला असल्याने पर्यटन विकासाचे माध्यमातून सेवा उद्योगास पर्यायाने रोजगार व स्वयंरोजगार वाढीस चालना मिळणार आहे.
किल्ल्याचे विकासाकरिता खासदार सुनील तटकरे यांच्या प्रयत्नाने एकूण अडीच कोटी रुपयांचा निधी मंजुर झाल्याने नगरपंचायतीचे माजी बांधकाम सभापती दीनेश लेंडे यांनी यावेळी खासदार श्री. तटकरे यांचे विशेष आभार व्यक्त केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष मुझफ्फर मुकादम, माजी सभापती भाई पोस्टुरे, नगराध्यक्षा अँड. सोनल बेर्डे, उपनगराध्यक्ष वैभव कोकाटे, नगरसेवीका सौ. प्रियांका लेंडे, नगरसेवक मुकेश तलार, दीनेश लेंडे, सुधीर हातमकर, भाई मालगुंडकर, वसिम चिपोळकर आदी मान्यवर उपस्थित होते.











