रत्नागिरी :
दिनांक १मार्च रोजी ब. प.विद्यालय मालगुंडच्या १९८४ बॅच स्मृतीगंधचा स्नेहमेळावा नेवरे मधुरा गार्डन येथे पार पडला.गेली ९ वर्ष हे माजी विद्यार्थी दर वर्षी अगत्याने एकत्र येऊन शाळेतले दिवस पुन्हा एकदा अनुभवतात.
या वर्षी स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा ब.प .विद्यालयाला भेट देऊन या माजी विद्यार्थ्यांनी शाळेचे ऋण अंशतः फेडण्याचा प्रयत्न केला.शाळेला आवश्यक असलेला वॉटर कुलर त्यांनी भेट दिला .
यासाठी गजानन जोशी,विनायक माचीवले,नंदन ढापरे,संजय सुर्वे,राजन जोशी,सहदेव दुर्गवळी,उमेश साळवी,निनाद कोसुंबकर,माधुरी पवार,कांचन केळकर,निता बापट,उदय लिंगायत,उदय पडवळे,रेखा रानडे,रेखा जाधव, अनंत बागवे,सुशील मिरकर,नीलिमा पडवळे,संगीता मालगुंडकर,संगीता मांडवकर,माधव आग्रे,रवी केळकर,संगमी मयेकर, सतीश सोबळकर,संतोष तोडणकर, छाया भोसले,सिंधू बापट,अमोल खेऊर,चारुहास मोरे,अनिल लवंदे ,विजय सुर्वे, राजश्री मालगुंडकर व संगीता पाटील यांनी योगदान दिले.
शाळेचे मुख्याध्यापक श्री.बिपिन परकर यांनी शाळेच्या वतीने या माजी विद्यार्थ्यांचे आभार मानले.











