कोकणासह सातारा, कोल्हापूर येथील खेळाडूंचा सहभाग,१४९ खेळाडू सहभागी
लांजा (प्रतिनिधी): येथील गणपती चेस अकॅडमी लांजाच्या वतीने आयोजित गणपती चेच अकॅडमी खुली जलद बुद्धिबळ स्पर्धा नुकतीच पार पडली. चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत सातारा येथील उमेश कुलकर्णी यांनी ७.५ गुणांसह प्रथम क्रमांक पटकावत विजेचे पदावर नाव कोरले.
रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत कोकणासह मुंबई, सातारा ,कोल्हापूर येथील खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. १४८ खेळाडूंचा उस्फुर्त असा प्रतिसाद या स्पर्धेला लाभला. विशेष म्हणजे यात तब्बल ३० फिडे मानांकित बुद्धिबळपटू होते.
या स्पर्धेचे उद्घाटन लांजा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ.सावली सुनील कुरूप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर त्यांच्यासह स्कॉर्पिओ सोलरचे संस्थापक रोहित सुर्वे ,गणपती चेस अकॅडमीच्या संस्थापिका आणि स्पर्धा संचालिका सौ. प्राची रोहित सुर्वे, तसेच श्री व सौ सुचिता सुधीर सुर्वे व श्री व सौ अनघा किशोर मयेकर उपस्थित होते. त्याचप्रमाणे लांजा येथील सामाजिक कार्यकर्ते शेखर स्वामी, नेत्र तज्ञ डॉक्टर सुहास देसाई लांजा शाळा क्रमांक पाच चे मुख्याध्यापक विश्वनाथ सुर्वे, तसेच स्वप्निल चव्हाण रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव चैतन्य भिडे, कोषाध्यक्ष मंगेश मोडक, ज्येष्ठ खेळाडू चारुदत्त उपाध्ये आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन मनोज रेडीज यांनी केले.
खुल्या गटात सातारा येथील उमेश कुलकर्णी यांनी विजेतेपद पटकावले. त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांक मयुरेश देसाई, तृतीय साहस नारकर, चतुर्थ यश गोगटे ,पाचवा क्रमांक मानस सिधये, सहावा सदानंद चौथे,सातवा अक्षय खेर, आठवा प्रवीण सावर्डेकर, नववा सोहम रूमडे, दहा साहिल बाधणे, अकरावा नारायण घोलप, बारावा आयुष रायकर, तेरावा अमृत तांबडे, १४ रुद्र मोबारकर, १५ वा सौरभ धारगळकर.
महिला गटात तनिष्का अडेलकर, २ रचना मुनणकर. ज्येष्ठ खेळाडू प्रथम संजय कामतेकर व सुनील शिंदे द्वितीय. ३६ ते ५५ वयोगटात विवेक जोशी यांनी प्रथम, मिलिंद नरवणकर द्वितीय तर जितेंद्र पटेल यांनी तृतीय क्रमांक. १६ ते ३५ वयोगटात सार्थक साबळे, द्वितीय सचिन कदम व तृतीय कौस्तुभ हर्डीकर. १५ वर्षाखालील गटात प्रथम यश काटकर, द्वितीय यश पवार तृतीय नंदन दामले. बारा वर्षाखालील गटात प्रथम विहंग सावंत, द्वितीय विराज बनसोड व तृतीय देवव्रत धूपकर. ९ वर्षाखालील गटात अन्वय साबळे, द्वितीय तन्मय केसरकर तृतीय दीपांशू दळवी
स्थानिक लांजा गटात प्रथम चारुदत्त उपाध्ये, द्वितीय तनिष किनरे व तृतीय शान बिरवाडकर. विशेष पारितोषिक स्पर्धेतील सर्वात लहान खेळाडू म्हणून वरद चव्हाण याला गौरविण्यात आले. स्पर्धेत पंच म्हणून आंतरराष्ट्रीय पंच शार्दुल तापसे (सातारा) यांनी काम पाहिले. त्यांना अपर्णा शिंदे, चैतन्य भिडे, प्राची सुर्वे, मोहसीन सय्यद आणि कीर्ती मोडक यांचे सहकार्य लाभले .
सर्व विजेत्यांना श्री व सौ सुचिता सुधीर सुर्वे, सौ अनघा किशोर मयेकर, चैतन्य भिडे, मंगेश मोडक यांच्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आले.











