खेड: जय हनुमान मित्र मंडळ, हेदली चिनकटेवाडी यांच्या वतीने शिमगा उत्सवानिमित्त साठीचा माळ येथे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला परिसरातील क्रिकेटप्रेमी तसेच ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
अत्यंत चुरशीच्या व रंगतदार झालेल्या अंतिम सामन्यात हेदली बाजारवाडी संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकावला, तर गायकवाडवाडी संघाने दमदार खेळ करत द्वितीय क्रमांक मिळवला.
स्पर्धेदरम्यान खेळाडूंनी क्रीडाभावना जपत उत्कृष्ट खेळ सादर केला. विजेता व उपविजेता संघांचा जय हनुमान मित्र मंडळाचे अध्यक्ष संदीप गोवळकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सचिन गोवळकर, संजय गोवळकर, सदानंद शिगवण,वैभव घाणेकरवामन चिनकटे, संतोष मेंगडे, राकेश मेंगडे, संतोष घाणेकर, संजय झुजम, सतीश गोवळकर, वसंत शिगवण, प्रणव बडबे, रमेश मेंगडे, संतोष शिंदे, भावेश गायकवाड व महेश मेंगडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
या आयोजनामुळे शिमगा उत्सवाला क्रीडामय वातावरण लाभले असून ग्रामस्थांनी आयोजकांचे कौतुक केले.












