रेकॉर्ड डान्स स्पर्धेत नंदिनी बिले प्रथम

कणकवली : कलमठ बाजारपेठ येथील शिवतेजा मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेत नंदिनी बिले हिने प्रथम क्रमांक पटकावला. गुरुनाथ तुळसकर याने द्वितीय तर वैष्णवी बोडके हिने तृतीय क्रमांक मिळवला. पूर्वा मेस्त्री आणि गंश परब यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले.

या स्पर्धेत १७ हून अधिक स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. स्पर्धेचे परीक्षण शशिकांत कांबळी आणि आर्या पोयेकर यांनी केले. स्पर्धेनंतर बक्षीस वितरण सोहळा उत्साहात पार पडला.

विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष सचिन कुवळेकर, उपाध्यक्षा अनिता साळगावकर, प्रसाद कांबळी, शशिकांत कांबळी, आर्या पोयेकर, दिनेश पाटील, अमित कांबळी, संदीप कांबळी, तुषार हजारे, सुयोग कांबळी, परेश कांबळी, स्वरुप कोरगावकर, निश्चिय हुन्नरे यांच्यासह मंडळाचे सदस्य व महिला सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.