सिंधुदुर्ग : सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांच्या वतीने जन्मतः कापलेले ओठ व टाळू (Cleft Lip & Palate) असलेल्या रुग्णांसाठी मोफत शस्त्रक्रिया करण्यासाठी शस्त्रक्रिया पूर्व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिरात पात्र रुग्णांची तपासणी करून त्यांना पुढे मोफत शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.विशेष म्हणजे या शस्त्रक्रियेसाठी भोजन, वास्तव्य आणि प्रवासाची व्यवस्थाही करण्यात येणार आहे.
हे तपासणी शिबिर दि.१० मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता कणकवली येथे आयोजित करण्यात आले आहे.या शिबिरासाठी ६ महिन्यांवरील वयोगटातील रुग्ण पात्र असून,पूर्वी शस्त्रक्रिया झालेली असली तरी असे रुग्णही तपासणीसाठी उपस्थित राहू शकतात,अशी माहिती आयोजकांनी दिली.
जन्मतः ओठ किंवा टाळू कापलेले असल्यामुळे अनेक मुलांना बोलण्यात,खाण्यात तसेच सामाजिक आयुष्यात अडचणी येतात.या पार्श्वभूमीवर अशा रुग्णांना मोफत शस्त्रक्रियेच्या माध्यमातून नवजीवन देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.
या शिबिराबाबत अधिक माहिती व नोंदणीसाठी 9404740490, 9421235586, 9403636454,9673365988 या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच या उपक्रमाची माहिती जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावी,अशी विनंतीही आयोजकांकडून करण्यात आली आहे.











