अभिनव फाउंडेशनचा दीपोत्सव उत्साहात संपन्न

सावंतवाडी । प्रतिनिधी : दिवाळी पाडव्याचे औचित्य साधून ऐतिहासिक मोती तलावाच्या काठावर अभिनव फाउंडेशन सिंधुदुर्ग या संस्थेच्या वतीने दीपोत्सवाचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याची सुरुवात युवराज श्री. लखमराजे भोसले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित सावंतवाडीकरांनीही स्वयंस्फूर्तीने तलावाच्या काठावर दिवे लावले, ज्यामुळे संपूर्ण मोती तलाव परिसर अक्षरशः हजारो दिव्यांच्या लखलखत्या प्रकाशात उजळून निघाला.
या उपक्रमात अभिनव फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी आपल्या कुटुंबासह उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. तलावाच्या काठावर मेण खाली पडून परिसराचे सौंदर्य बिघडू नये, यासाठी आयोजकांनी खास प्रकारच्या दिव्यांची निवड केली होती. तसेच, नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या आकर्षक सेल्फी पॉईंटवर अनेकांनी फोटो आणि सेल्फी घेत हा आनंददायी क्षण आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपला. विशेष म्हणजे, दीपोत्सवाची सांगता झाल्यानंतर अभिनव फाउंडेशनच्या सदस्यांनी तलाव काठावर राहिलेले सर्व दिवे स्वतः गोळा करून परिसराची स्वच्छता राखत एक आदर्श आणि अभिनव उपक्रम राबवला.
या दीपोत्सवाला दत्तप्रसाद गोठोसकर, नगरसेविका मोहिनी मडगांवकर, संतोष वैज, सीए. चिन्मय रानडे, किशोर चिटणीस, अण्णा म्हापसेकर, डॉ. प्रसाद नार्वेकर, राजू केळूसकर, जितेंद्र मोरजकर, तुषार विचारे, अमित आरवारी, जतीन भिसे, मंदार केरकर, बाळू वालावलकर, प्रथमेश मुरगूड, अमित सुकी, मयूर मिशाळ, मंदार पावसकर, रवींद्र आरोलकर, मुकुंद वझे, विनायक रांगणेकर, श्रीराम नेवगी, अनुष्का केळूसकर, प्राची रानडे, हेमश्री चिटणीस, अक्षया म्हापसेकर, नम्रता नेवगी, रुपाली नार्वेकर, पूजा आरवारी, संजीवनी विचारे, पूर्वा केरकर, विशाखा रांगणेकर आदींसह सावंतवाडीकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.













