ग्रामपंचायतींमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन
रत्नागिरी :
जल जीवन मिशन अतंर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोई किमान 55 लिटर प्रतीदिन, गुणवत्तापुर्ण पाणी पुरवठा करणे हे जल जीवन मिशनचे प्रमुख उद्दीष्ट आहे. ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणा अधिक शाश्वत व मजबूत करण्यासाठी, तसेच सामुदायिक सहभाग वाढवण्यासाठी ‘जल महोत्सव’ या नावाने महोत्सव मोठ्या स्वरूपात दरवर्षी दिनांक 8 ते 22 मार्च, 2026 या कालवधीमध्ये राबवण्याचा निर्णय घेण्यात आले आहे. याअनुषंगाने राज्यात दरवर्षी दिनांक 8 ते 22 मार्च, 2026 या कालावधीत ‘जल महोत्सव पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रमात जिल्हयातील ग्रामपंचायतीमध्ये लोकसहभागातून गावात ग्रामसभा आणि पाणी समिती (WSC) द्वारे प्रत्यक्ष कृतींवर भर देणे. महिलांद्वारे जल गुणवत्ता चाचणी: फिल्ड टेस्टिंग किट (FTK) वापरून तपासणी करण्यात येणार आहे. बैंक टू रूट्स (आपले गाव, आपला पाण्याचा स्रोत): लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी आपल्या गावातील जलस्रोतांच्या संरक्षणासाठी पुढाकार घेतील. जल संचयः जलस्रोतांचे पुनरुज्जीवन आणि स्वच्छता करणे. जल अर्पणः पाणीपुरवठा योजनांचे औपचारिक हस्तांतरण आणि सामुदायिक शपथ घेणे. पंचायत जल नियोजन दिवसः ग्रामपंचायत विकास आराखड्यात (GPDP) पाण्याचा समावेश करणे, असे विविध उपक्रम घेणेबाबत सुचित केले असून, ‘जल महोत्सव’ चे उद्दिष्ट हे पिण्याच्या पाण्याला सांस्कृतिक आणि सामाजिक प्राधान्य देणे. राज्यांना स्थानिक जल उत्सव संस्थात्मक करण्यासाठी प्रोत्साहित करणे. राज्य ते गाव स्तरापर्यंत विविध विभागांमध्ये समन्वय साधणे. पाणी गुणवत्ता, सौर ऊर्जा आणि देखभाल-दुरुस्तीसाठी दीर्घकालीन आराखडा तयार करणे. आरोग्य, पोषण आणि महिला सक्षमीकरणाला जल सेवेशी जोडणे त्या अुनषंगाने दरवर्षी ‘जागतिक महिला दिन’ म्हणजेच दिनांक 8 मार्च, 2026 ते ‘जागतिक जल दिन’ म्हणजेच दिनांक 22 मार्च, 2026 या कालावधीत ‘जल महोत्सव’ ग्रामपंचायतीमध्ये राबविण्यात यावे असे आवाहन प्रकल्प संचालक (पाणी व स्वच्छता) मा.श्री.सागर पाटील यांनी केले.











