BREAKING : अखेर ठरलं, लांजा पं. स. सभापतीपदी मानसी आंबेकर, तर उपसभापतीपदी आदेश आंबोळकर त्यांची नावे निश्चित

सोमवारी होणार निवड होणार जाहीर ,पदग्रहण सोहळा

लांजा (प्रतिनिधी) लांजा पंचायत समितीच्या सभापतीपदी अखेर मानसी आंबेकर आणि उपसभापतीपदी आदेश आंबोळकर यांचे नाव निश्चित झाले असून उद्या सोमवारी नऊ मार्च रोजी दोघेही आपल्या पदाचा पदभार स्वीकारतील .
नुकत्याच पार पडलेल्या लांजा तालुक्यातील आठ पंचायत समिती गण आणि चार जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीत आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने सर्वच्या सर्व बारा जागांवर दणदणीत विजय प्राप्त केला होता. या निवडणुकीत आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने सर्वच पक्षांना धोबीपछाड दिला होता.

आता एकतर्फी वर्चस्व प्राप्त असलेल्या लांजा तालुका पंचायत समितीच्या सभापतीपदी कोणाची वर्णी लागणार याकडे लांजा तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते. मात्र यापूर्वीच दैनिक प्रहारने सभापतीपदी मानसी आंबेकर यांची वर्णी लागेल असे वृत्त प्रसिद्ध केले होते. हे वृत्त तंतोतंत खरं ठरले असून सभापतीपदी मानसी आंबेकर आणि उपसभापतीपदी आदेश आंबोळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तबच झाले आहे. उद्या सोमवारी ९ मार्च रोजी याबाबतची अधिकृत घोषणा होऊन दुपारी तीन वाजता हे दोन्ही पदाधिकारी आपल्या पदाचा पदभार स्वीकारणार आहेत.

सभापतीपदी आणि उपसभापती ही दोन्ही पदे सव्वा वर्षासाठी असून सुरुवातीची पहिल्या सव्वा वर्षासाठी मानसी आंबेकर आणि आदेश आंबोळकर यांना संधी देण्यात आली आहे.