आज दर्यावर्दी प्रतिष्ठानच्या वतीने गुणवंत सत्कार समारंभाचे आयोजन

 

प्रतिवर्षाप्रमाणे या ही वर्षी दर्यावर्दी प्रतिष्ठान पालशेत, ता.गुहागर या संस्थेच्या वतीने पंचक्रोशी मधील शैक्षणिक गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी त्याचबरोबर विशेष गौरवस पात्र असलेले पंचकोशीतील नागरिक या सर्वांचा यथोचित सन्मान प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत करण्यात येतो.आज रविवार दि.३० जुलै,२०२३ रोजी,दुपारी ३.०० वाजता श्रीमती रखुमाई पांडुरंग पालशेतकर विद्यालय,पालशेत. येथे गुणवंत सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अशोक गावनकर, शिक्षण विस्तार अधिकारी ,गुहागर श्रीकांत वेल्हाळ,केंद्रप्रमुख,अडुर केंद्र. रामदास दादा कदम, मुख्याध्यापक,श्रीमती.आर.पी.पालशेतकर विद्यालय,पालशेत.हे उपस्थित राहणार आहेत.
आपण सर्वांनी या कार्यक्रमामध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून गुणवंतांच्या पाठीवर शाबासकीची थाप द्यावी असे आवाहन दर्यावर्दी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले.