चिपळूण पाग नाका येथे आलेले खवले मांजर किरण केळसकर यांच्यामुळे सुखरूप पोहोचले अधिवासात

चिपळूण : चिपळूण येथील पाग नाका येथे श्री.किरण केळसकर यांच्या घराचा मागील बाजूस असलेल्या शेड मध्ये खवल्या मांजर आले असल्याने श्री.किरण केळसकर यांनी भ्रमणध्वनी वरून वन विभागास श्रीम.कीर वनक्षेत्रपाल चिपळूण यांना कळवले असता. सदर ठिकाणी वनक्षेत्रपाल यांचा आदेशावरून वनपाल चिपळूण, वनरक्षक कोळकेवाडी ,वनरक्षक रामपुर, वाहन चालक कदम घटना स्थळी तात्काळ पोहचून सदर खवले मांजर resque करून ताब्यात घेऊन दिनांक २७/०७/२०२३ रोजी पशु वैद्यकीय अधिकारी डॉ पिसे यांच्याकडून वैधकिय तपासणी करून सुस्थितीत असल्याची खात्री करून घेतली.सायंकाळी मानद वन्यजीव रक्षक श्री.निलेश बापट साहेब यांचा उपस्थित मध्ये सदर खवले मांजरस नैसर्गिक अधिवसात मुक्त केले.सदरचे resque ऑपरेशन मा.विभागीय वन आधिकरी श्री.खाडे, सहायक वन संरक्षक श्री.बोराटे , वनक्षेत्रपाल चिपळूण श्रीम.कीर यांचा मार्गदर्शना खाली केले आहे.