वेरळ धनगरवाडी नळपाणी योजनेचा जल अर्पण सोहळा उत्साहात संपन्न!

मसुरे | झुंजार पेडणेकर मालवण तालुक्यातील ग्रामपंचायत वेरळ धनगरवाडी येथे जल जीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजनेचा जल अर्पण व हस्तांतरण प्रक्रिया कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, पंचायत समिती मालवण आणि ग्रामपंचायत वेरळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत वेरळ प्रशालेचे मुख्याध्यापक राजेंद्र धारपवार यांनी केले तर मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. कलश पूजन, जलबंधन, महिलांची जलकलशासह जलदिंडी व सर्वांच्या उपस्थितीत नळपाणी योजनेचे मान्यवरांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आणि पाणी हे जीवन आहे त्याचा योग्य वापर कसा करावा याचे घोषणा फलक शालेय विद्यार्थ्यांनी दाखवून जल जीवनाचे संदेश दिले. पाण्याचे महत्त्व आणि वापर या बाबत संबोधीतकरणारे विद्यार्थ्यांचे पथनाट्य सादर करण्यात आले. त्या नंतर विस्तार अधिकारी ग्रामपंचायत विभाग मालवण श्री लक्ष्मण हांडे, सरपंच धनंजय परब, अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा मालवण राणी लाड,मनीष सावंत,शुभम त्रिंबककर, ग्रामपंचायत अधिकारी मनस्वी कुणकवळेकर व मुख्याध्यापक राजेंद्र धारपवार इत्यादींनी जल अर्पण व हस्तांतरण प्रक्रिया कार्यक्रमा बाबत विशेष मार्गदर्शन केले.तसेच जल शपथ आणि महिला दिन विशेष महिला सभा घेण्यात आली.

यावेळी सरपंच धनंजय परब, उपसरपंच दिनेश परब, वि.अ. ग्रामपंचायत विभाग लक्ष्मण हांडे, ग्रामीण पाणी पुरवठा मालवण अभियंता श्रीमती राणी लाड, अभियंता मनिष सावंत, शुभम त्रिंबककर, सौ. मनस्वी कुणकवळेकर, ग्रामपंचायत अधिकारी सुवर्णा परब, ग्रामपंचायत सदस्या, नम्रता मेस्त्री, गणेश परब, राजेंद्र धारपवार, सहशिक्षक उमेश खराबी, अविनाश उबाळे, सौ.रंजना भोगले, सौ. आर्या तेंडोलकर, आरती परब, कृषि सहाय्यक कीरण भोईवाडा, गणेश शिंगाडे,सौ. अनवी तांबे, अनंत भोगले, सचिन परब,नाऊ खरात, रामा शिंगाडे, राजेश खरात, सावित्री शिंगाडे, सोनाली खरात, आणि वेरळ धनगरवाडीतील ग्रामस्थ, वेरळ गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सूत्रसंचालन मुख्याध्यापक राजेंद्र धारपवार यांनी केले तर आभार ग्रामपंचायत अधिकारी सौ. मनस्वी कुणकवळेकर यांनी मानले.