श्रीमती सुमित्रा परब यांचे निधन

मसुरे | प्रतिनिधी : पळसंब गावठणवाडी येथील श्रीमती सुमित्रा लवु परब ( 93 वर्ष ) यांचे मुबई येथे राहत्या घरी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले . त्यांच्या पश्चात मुलगे, मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे .
श्री. जयंतीदेवी सांस्कृतिक कला मंडळाचे आजीव सभासद श्री. संजय परब व सामाजिक कार्यकर्ते श्री. गिरीधर परब यांच्या त्या आई होतं.