मळगाव कुंभारवाडीतील युवक संकेत शिरोडकर याचे निधन

​सावंतवाडी : तालुक्यातील मळगाव कुंभारवाडी येथील रहिवासी संकेत नवनाथ शिरोडकर ( वय २२ ) याचे गुरुवारी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास निधन झाले. ​पंधरा दिवसांपूर्वी गोवा धारगळ येथे त्याचा अपघात झाला होता. त्यानंतर संकेतवर गेल्या पंधरा दिवसांपासून गोव्यातील बांबोळी येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु, उपचारादरम्यान शुक्रवारी रात्री अखेर त्याची प्राणज्योत मालवली.

घरातील एक कर्तबगार आणि तरुण मुलगा अचानक निघून गेल्यामुळे शिरोडकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पक्षात आई व मोठा भाऊ असा परिवार आहे. कुंभारवाडी येथील रहिवासी बाळा शिरोडकर यांचा तो पुतण्या होय. त्यांच्या अकस्मात जाण्याने मळगाव आणि परिसरात सर्वत्र तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. ​