सरपंच प्रणीती आबंडपालकर होणार सहभागी
परुळे : प्रतिनिधी
राष्ट्रीय जलजीवन मिशन अंतर्गत जल महोत्सव पंधरवडा सर्वत्र साजरा करण्यात येत आहे. याचाच एक भाग ११ मार्च रोजी राष्ट्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात राष्ट्रीय कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमात वेंगुर्ले तालुक्यातील ग्रामपंचायत परुळेबाजार सरपंच प्रणीती आबंडपालकर यांना आमंत्रित केले असून त्यांना या कार्यक्रमात सहभागी होण्याचा सन्मान मिळाला आहे. त्या सिंधुदुर्ग जिल्हा चे प्रतिनिधित्व करणार आहेत.
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्यातील चाळीस हजार ग्रामपंचायती मधून १२ जिल्ह्यातील १२ गावांची निवड झाली आहे. यात परुळेबाजार ग्रामपंचायती ची निवड झाली आहे. त्यामुळे सरपंच आंबडपालकर यांना ११ मार्च रोजीचा विज्ञान भवन नवी दिल्ली येथे आयोजीत कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे निमंत्रण प्राप्त झाले होते. त्या कार्यक्रमाला रवाना झाल्या आहेत. त्यांच्या सोबत ग्रामपंचायत अधिकारी शरद शिंदे सहभागी असणार आहेत. नुकतेच जल महोत्सव परुळे कर्ली गावात मोठ्या उत्साहाने संपन्न झाला. त्यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्री. व्ही.सोमन्ना, पालकमंत्री नितेश राणे यांच्या सह मान्यवर उपस्थित होते. दरम्यान परुळेबाजार ग्रामपंचायती चे जलजिवन मिशन अंतर्गत चांगले काम झाल्याने ही निवड झाली आहे.











