गुहागर l प्रतिनिधी :गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे गावची सुकन्या अस्मि विक्रांत मोरे हिची दिल्ली येथे होणाऱ्या १४ वर्षाखालील मुलींच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाल्याबद्दल नुकतेच तिला गुहागर मनसेच्यावतीने गौरविण्यात आले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा मुंढर आयोजित दहिहंडी उत्सव २०२५ या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना गुहागर यांच्या वतीने गुहागर संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या हस्ते हा गौरव करण्यात आला.तसेच तिला स्पर्धेकरिता शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी मनसे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुकाध्यक्ष सुनिल हळदणकर मनविसे तालुकाध्यक्ष प्रथमेश रायकर,तालुका सचिव प्रशांत साटले, शहराध्यक्ष अभिजित रायकर,असगोली गण उपतालुकाध्यक्ष अमित खांडेकर ,शृंगारतली गणउप तालुकाध्यक्ष जितेन्द्र साळवी, मुंढर शाखाध्यक्ष सुजित गांधी आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.












