परबवाडा येथे १८ मार्च पासून “कणकेवाडी युवा महोत्सव २०२६” चे आयोजन : सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

वेंगुर्ले | प्रतिनिधी : परबवाडा कणकेवाडी येथील युवा परबवाडा कणकेवाडी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाच्या वतीने “कणकेवाडी युवा महोत्सव २०२६” चे आयोजन करण्यात आले आहे. परबवाडा कणकेवाडी ब्राह्मण मंदिराजवळ हा महोत्सव संस्कृतीचा संगम आणि आनंदाचा महोत्सव म्हणून बुधवार दि. १८ ते शुक्रवार दि. २० मार्च २०२६ या तीन दिवसीय कालावधीत संपन्न होणार आहे.
महोत्सवाची सुरुवात बुधवार दि. १८ मार्च रोजी सायं. ७.०० वाजता मान्यवरांच्या स्वागत समारंभाने होणार असून सायं. ७.३० वाजता श्री सावरेश्वर दशावतार नाट्य मंडळ यांचे ‘श्री क्षेत्र गाणगापूर’ हे नाटक सादर होणार आहे.
गुरुवार दि. १९ मार्च रोजी सायं. ७.०० वाजता परबवाडा गावातील लहान मुले व महिलांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. तसेच रात्री ९.०० वाजता महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धा आणि खेळ संगीत पैठणीचा हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून ही स्पर्धा गावमर्यादित राहणार आहे.

महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी शुक्रवार दि. २० मार्च रोजी सायं. ७.०० वाजता ‘लाईव्ह शो “गर्जा महाराष्ट्र माझा’ हा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे. सिंधुदुर्गातील कलाकारांच्या सहभागातून नृत्य, नाट्य आणि संगीताचा बहारदार कार्यक्रम प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
या महोत्सवासाठी नाव नोंदणीसाठी मंगेश गावडे (मो. ८४२१९१०२६०) व किशोर मोर्ये (मो. ७४२०८१०१३१) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच अधिक माहितीसाठी हेमंत गावडे (मो. ९४२१२३५१२८) व सागर करुणकुटकर (मो. ९१७५८०४१३१) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या सांस्कृतिक महोत्सवाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक मंडळाने केले आहे.