राजापूरच्या नवनिर्वाचित सभापती नंदिनी कदम यांचा शिवसेना धोपेश्वर विभागाच्या वतीने सत्कार

राजापूर प्रतिनिधी:  राजापूर तालुका पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती नंदिनी कदम यांचा शिवसेना धोपश्वर विभागाच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला. तालुका पंचायत समितीच्या सभापती दालनात कदम यांचा विभागाच्या वतीने विभाग प्रमुखांसह मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी सत्काराप्रती कृतज्ञता व्यक्त करत सभापती सौ. कदम यांनी धोपेश्वर विभागातील विकास कामांना आपण निश्चितच प्राधान्य देऊ अशी ग्वाही शिवसेना पदाधिकारी यांना दिली.
याप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख दिपक नागले, धोपेश्र्वर विभाग प्रमुख जितेंद्र तुलसवडेकर, चिखलगाव माजी सरपंच व विद्यमान उपसरपंच योगेश नकाशे, माजी सभापती सुभाष गुरव,कोदवली माजी सरपंच विलास गुरव,रमेश गोडांबे, प्रनोती भोसले तीठवली गावच्या महीला तालुका संघटक मानसी तिरलोटकर धोपेश्र्वर तंटामुक्ती अध्यक्ष पुरुषोत्तम खांबल, चिखलगाव शाखाप्रमुख हितेश पळसमकर, शेढे शाखाप्रमुख विलास बावकर, पाथरडे शाखाप्रमुख संजय बावकर, गोवळ गावचे संतोष गुरव, सुनील जाधव गणेश केलंबेकर धोपेश्र्वर शाखाप्रमुख लवू बाईत, सौरभ मसुरकर गौरव शिंदे, बारसू शाखाप्रमुख संदेश कदम, हर्डी गावचे शिवसेना पदाधिकारी रोहित पड्यार सुनील पड्यार धोपेश्वर सरपंच उमेश शिवगण धोपेश्र्व माजी सरपंच गणेश पाष्टे गोठणे दोनिवडे शाखाप्रमुख उदय हातणकर, उल्हास विचारे युवासेना पदाधिकारी महेश नकाशे प्रवीण नागरेकर गौरव सोरप, प्रसाद गुरव, तुषार सुर्वे, लीलाधर गुरव, गोवल शाखाप्रमुख प्रशांत गुरव दिपक तांबे आदीसंह शिवसेना पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.