वेळणेश्वर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाचा MHT-CET Mock App विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध

गुहागर प्रतिनिधी:
गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर येथील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय यांनी MHT-CET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी “MPCOE Mock CET” हे मोबाईल अ‍ॅप सुरू केले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सराव चाचण्या देऊन परीक्षेची तयारी अधिक प्रभावीपणे करता येणार आहे.

या अ‍ॅपमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या तीन विषयांतील प्रत्येकी १० टेस्ट उपलब्ध असून एकूण ३० सराव चाचण्या देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना या अ‍ॅपद्वारे एकूण १५०० प्रश्न सोडवण्याची संधी मिळणार आहे. तसेच प्रत्येक प्रश्नाचे योग्य उत्तर कसे मिळते याचे सविस्तर स्पष्टीकरणही देण्यात आले आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना संकल्पना अधिक स्पष्ट होण्यास मदत होणार आहे.

महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांना प्ले स्टोअरवर “MPCOE Mock CET” असे टाइप करून किंवा https://play.google.com/store/apps/details?id=com.sbit.android.app.mpcoemockmhtcet याठिकाणी क्लिक करून सदर अ‍ॅप डाउनलोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या अ‍ॅपमुळे MHT-CET परीक्षेच्या तयारीत विद्यार्थ्यांना मोठी मदत होईल, असा विश्वास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश पवार यांनी व्यक्त केला. अधिक माहितीसाठी संपर्क डॉ. गणेश दिवे, भ्रमणध्वनी ९९६०८६२८३४ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.