मसुरे | झुंजार पेडणेकर : मालवण तालुक्यातील देऊळवाडा ग्रामपंचायतच्या नवीन इमारतीचे लोकार्पण मसुरे देवस्थान प्रमुख बाबुराव प्रभूगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.मान. बाळासाहेब ठाकरे ग्रामपंचायत बांधणी योजना या योजनेतून सोळा लाख 58 हजार रुपये निधी इमारतीस प्राप्त झाला आहे.
मसुरे देवस्थान प्रमुख बाबुराव प्रभूगावकर यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी ग्रामपंचायत प्रशासक विनायक कृष्णा जाधव, ग्रामपंचायत अधिकारी प्रकाश विठ्ठल सुतार
, श्री जयकुमार उर्फ बच्चू प्रभुगावकर, माजी पंचायत समिती सदस्य महेश बागवे, किशोर अभ्यंकर, देऊळवाडा माजी सरपंच आदिती मेस्त्री, माजी उप सरपंच नरेंद्र सावंत, माजी ग्राम पंचायत सदस्य चंद्रकांत राणे, अशोक मसुरकर, सौ. अभ्यंकर उपस्थित होत्या .
यावेळी बोलताना प्रशासक विनायक जाधव म्हणाले, गाव विकासा संदर्भात कोणत्याही समस्या असल्यास ग्रामस्थांनी वेळोवेळी ग्रामसभेला उपस्थित राहून चर्चा सत्रातून मांडाव्यात. गावातील पाणी आणि दळणवळण इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रशासक म्हणून निश्चितच न्याय देण्याचा प्रयत्न करेन.
यावेळी कृष्णा बागवे, ग्रामपंचायत कर्मचारी सौ संदीपा कबरे, गणेश सांडव, तेजस परब, बाबुराव बागवे, अशोक बागवे, नारायण मसुरकर,प्रकाश सांडव, शिवाजी बागवे, सुरेश बागवे, सोनोपंत बागवे, सुरेश परब, विलास मेस्त्री, म्हातू सावंत, शेखर खाडिलकर, पोलीस पाटील नेवेश फर्नांडिस, संतोष चव्हाण, दीपक तांबे,
सर्व देऊळवाडा खेरवंद ग्रामस्थ उपस्थित होते.











