नगर परिषद प्रशासनाकडून शहरातील धोकादायक झाडे हटविण्यास सुरूवात

राजापूर (वार्ताहर): आठवडा बाजारात झाड पडून झालेल्या दुर्घटनेनंतर राजापूर नगर परिषदेने शहरातील धोकादायक असलेल्या झाडांचा शोध मोहीम हाती घेतली आहे. त्यातून ही धोकादाय झाडे तोडण्याचा निर्णय नगर परिषदेनेन घेतला आहे. या अनुषंगाने राजापूर हायस्कुल नजीक असलेली गुलमोहराची धोकादायक झाडे रविवारी नगर परिषदेच्या वतीने तोडण्यात आली.

राजापूर हायस्कूल समोर अनेक वर्षांपासून धोकादायक स्थितीत असणारी ही झाडे शाळेतील विद्यार्थ्यांची तसेच बँक व दवाखान्या मध्ये नागरिकांची व वाहनांची नेहमीच मोठी वर्दळ असल्याने तोडणे अशक्यप्राय वाटत होते. आपल्या जाबाबदारीची जाणीव ठेवून आरोग्य व बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांनी रविवारी सुट्टीच्या दिवशी वर्दळ कमी असल्याने उपस्थित राहून ही धोकादायक झाडे तोडून बाजूला केली.

राजापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत भोसले व मुख्य लिपिक जिंतेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. यावेळी वाहतुकीची समस्या निर्माण होऊ नये म्हण्न पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. या झाड तोडण्या कामी नगर परिषदेच्या बांधकाम व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. तर महेश बाकाळकर यांनी यासाठी विशेष सहकार्य केले. अशा प्रकारे राजापूर नगर परिषद हद्दीत सार्वजनिक ठिकाणी आणि वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या झाडांचा सर्व्हे करून ही झाडे नगर परिषदेच्या वतीने तोडण्यात येणार आहेत. तर योग्य त्या ठिकाणी नव्याने काही झाडांची लागवड नगर परिषदेच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहीती मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी दिली आहे.

फोटो 31 आरजेपी 2

राजापूर हायस्कुल नजीकची धोकादायक झाडे तोडताना नगर परिषदेचे कर्मचारी.