जिल्हा संयोजक पदी ऍड. दीपक पटवर्धन आणि रत्नागिरी नगरपरिषद निवडणूक संयोजक पदी सचिन वहाळकर यांची नियुक्ती

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी (भाजप) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष (आ.) रवींद्र चव्हाण यांनी स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात दोन महत्त्वाच्या नियुक्त्यांची घोषणा केली आहे.

ऍड. दीपक पटवर्धन यांची रत्नागिरी दक्षिण जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता जिल्हा संयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

श्री. सचिन वहाळकर यांची रत्नागिरी नगरपरिषद निवडणूक संयोजक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रदेशाध्यक्ष (आ.) रवींद्र चव्हाण यांनी १२ नोव्हेंबर २०२५ रोजी ही नियुक्ती पत्रे जारी केली आहेत. दोन्ही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या संघटनात्मक कौशल्याने भाजपचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन अथक परिश्रम करावेत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. ही जबाबदारी केवळ स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.