एका चारचाकी सह दोन दुचाकी जप्त…
प्रतिनिधी/ रोहन कांबळे
कोल्हापुर: गडहिंग्लज विभागात राज्य उत्पादन शुल्क पथकाने अवैद्य मद्य विक्री व वाहतूकी विरोधात मोठी कारवाई करत गोवा बनावटी मद्य तसेच हातभट्टी दारू साठा आणि तीन वाहनांसह एकूण ७ लाख ३३ हजार साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त राजेश देशमुख, सहाय्यक आयुक्त दक्षता सुर्वे तसेच कोल्हापूरचे विभागीय उप आयुक्त विजय चिंचाळकर तसेच जिल्हा अधीक्षक स्नेहलता नरवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी गोवा बनावटीचा मद्य साठा आणि वाहतूक करण्यासाठी वापरलेली एक चार चाकी व दोन दुचाकी या गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी सागर भुसुळे,अमृत भोसले, प्रकाश नाईक, शंकर पाटील यांच्यावर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
जप्त मुद्देमालामध्ये गोवा बनावटीचा मद्यसाठा ३ लाख ६१ हजार दहा रुपये,हातभट्टी दारूसाठा ७ हजार पन्नास रुपये तसेच वाहतूक करणारी वाहने तीन लाख ६५ हजार रूपये इतका समावेश आहे.
या कारवाईत निरीक्षक प्रमोद खरात, दुय्यम निरीक्षक दिवाकर वायदंडे, रोहित केरीपाळी,स्वप्निल पाटील, सहाय्यक दुय्यम निरीक्षक प्रदीप गुरव, जवान संदीप जानकर, भरत सावंत,महिला जवान स्वप्नाली बेडके व वाहन चालक अविनाश यांनी सहभाग घेतला













