मुस्लिम वेलफेयर सोसायटी लांजाची सामाजिक बांधिलकी
लांजा (प्रतिनिधी): जातीभेदाच्या भिंती पार करून गेल्या ११ वर्षांपासून सातत्याने सामाजिक स्तरावर विशेष कामगिरी करणार्ऱ्या मुस्लिम वेलफेयर सोसायटी या संस्थेने रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर
सर्व धर्मातील गोरगरीब जनतेला सुमारे २ हजार रुपये किंमतीच्या जीवनावश्यक वस्तूंच्या २५० किटचे वाटप करून संस्थेने सामाजिक बांधिलकी जोपासली आहे
मुस्लिम वेलफेयर सोसायटी गेली ११ वर्ष सातत्याने सर्व धर्मातल्या लोकांना रमजान सारख्या पवित्र महिन्यात गोर गरिबांना अन्न धान्य चे किट म्हणजेच रमजान किट सातत्याने वाटप करीत आहे. रमजान किट मध्ये मध्ये १० किलो तांदूळ, १० किलो घवाचे पिट, ५ किलो कांदा, बटाटा, २ लिटर तेल, ३ किलो साखर, खजूर व इतर इफतारी आयटम तसेच १ किलो सगळ्या डाळी व इतर सामान आदी वस्तूंचा या किटमध्ये समावेश आहे.प्रत्येक किट हा सर्व साधारण २००० रुपये किमतीचा आहे.
हम सबके सब हमारे हे ब्रीदवाक्य घेऊन मुस्लिम वेलफेयर सोसायटी लांजा ही संस्था जातीभेदाच्या भिंती पार करून आपले काम करत आहे. ५ वर्षापूर्वी कोरोना काळात आणि ३ वर्षा पूर्वी महापुरात संस्थेने शेकडो कुटुंबियांना ४० ते ५० लाख रुपयांच्या अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तुंचे वाटप केले होते. तसेच रत्नागिरी, लांजा प्रत्येक हॉस्पिटल सैरी इफतारी सोय करण्यात आली. तसेच रोजेदारांना इफ्तार पार्टी जेवणाची व्यवस्था करण्यात आली
हम सबके सब हमारे या ब्रीद वाक्याप्रमाणे संस्था सामाजिक बांधिलकी जपते आहे संस्थेचे अध्यक्ष रफिक नाईक आणि कार्यध्यक्ष तसेच संस्थापक अकील नाईक यांनी बऱ्याच ठीकाणी राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवून आणल्याचे निर्दशनास येते. मग ते शिक्षण असो पर्यावरण असो, आरोग्य असो किंवा इतर धार्मिक सण असो मुस्लिम वेलफेयर सोसायटी जिल्ह्यात अग्रेसर आहे.
किट वाटप प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष रफिक नाईक, कार्यध्यक्ष अकील नाईक, रत्नागिरी तालुका अध्यक्ष समद सोलकर, रत्नागिरी शहर अध्यक्ष सलमान हाजू, मौलाना हकीम तहमीद आलम, अर्श नाईक, मोईप नाईक, वसील नेवरेकर, नाझिम नाईक, अरमान नाईक, मुबारक प्रभुळकर, तौफिक,ताजू बरमारे, आमीन बागवान, तसेच मुस्लिम वेलफेयर सोसायटी चे हितचिंतक व सल्लगार, इलाईट डेव्हलोपरचे सर्वेसर्वा समीर घारे या सर्वांनी सहकार्य केले.












