तालुक्यातील २४ निमंत्रित संघांचा सहभाग
रविवारी २२ रोजी पारितोषीक वितरण सभारंभ
राजापूर प्रतिनिधी :मालवण-कुडाळचे आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ एन. आर. प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र नागरेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त राजापुरात एन. आर. प्रतिष्ठान, राजापूर, रविदादा सहयोगी मित्रमंडळ व शिवसेना राजापूर यांच्यावतीने दिनांक १७ ते १९ मार्च या कालावधीत विविध सामाजिक उपक्रमांचे व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी २२ मार्च रोजी राजापुरात राजीव गांधी क्रिडांगणावर एन. आर. प्रतिष्ठान, आशिष मालवणकर मित्र मंडळ व अशफाक हाजू मित्र मंडळाच्या वतीने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवार १७ मार्च ते रविवार २२ मार्च या कालावधीत राजीव गांधी क्रिडांगणावर या स्पर्धा होत आहेत.
या क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ एन. आर. प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र नागरेकर यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला. याप्रसंगी आशिष मालवणकर मित्र मंडळाचे आशिष मालवणकर, अशफाक हाजू मित्र मंडळाचे अशफाक हाजू यांसह जब्बार काझी, सुदेश नार्वेकर, बाळा सावंत, प्रशांत मराठे, ऋ षीकेष अमरे, बाळु चव्हाण, प्रल्हाद तावडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
या स्पर्धेत तालुक्यातील २४ संघांनी सहभाग घेतला आहे. या स्पर्धेच्या नियोजनासाठी आशिष मालवणकर मित्र मंडळाचे आशिष मालवणकर व सहकारी परिश्रम घेत आहेत.
या स्पर्धेचा सांगता समारंभ रविवारी २२ मार्च रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.













