आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण शिवसेना शाखेचा उपक्रम
जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित
मालवण | प्रतिनिधी : तप्त उन्हात मच्छिविक्रीचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवणाऱ्या मालवणातील मत्स्यविक्रेत्या महिलांना आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण शिवसेना शाखेच्या वतीने मोठया छत्र्या भेट म्हणून देण्यात आल्या. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत आणि नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्याहस्ते या छत्र्या सुपूर्द करण्यात आल्या. 75 पेक्षा जास्त महिला यावेळी उपस्थित होत्या.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापार्डेकर, आरोग्य सभापती पूनम चव्हाण, महिला व बाल कल्याण उपसभापती अश्विनी कांदळकर, नगरसेवक सिद्धार्थ जाधव, नगरसेविका मेघा सावंत, भाग्यश्री मयेकर, मेघा गावकर, नीना मुंबरकर, शहर संघटक राजू बिडये, राजा गावडे, मोहन वराडकर, सूर्यकांत फणसेकर, बाळू नाटेकर, अभय कदम, निशय पालेकर, महेश सारंग, भाऊ मोर्जे, भाई मांजरेकर, विलास मुणगेकर, शेखर गाड, राजन परुळेकर, नंदू देसाई, सुशील शेडगे, संदीप मालंडकर, सुरेश चौकेकर, अखिलेश शिंदे, उमेश बिरमोळे, प्रशांत बिरमोळे, सूरज बिरमोळे, दिलीप बिरमोळे, बाळा माने, मधुरा तुळसकर, प्रियांका मेस्त्री, मार्टिन फर्नांडिस, पूजा खरपकर, रणशिंग, संध्या परुळेकर, मीनल परब, अश्विनी परुळेकर, सौ. लुडबे, नंदिनी हडकर यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, आमदार निलेश राणे संपर्क कार्यालयात श्री सत्यनारायणाची महापूजा ही आयोजित करण्यात आली होती. यावेळी भाविकांचीही उपस्थिती होती.
फोटो : मालवण शिवसेनेच्या वतीने मत्स्यविक्रेत्या महिलांना मोठया छत्र्यांचे वितरण करण्यात आले. (अमित खोत, मालवण)












