दापोली | प्रतिनिधी : संस्कार भारती उत्तर रत्नागिरी जिल्हा आणि निळकंठ गोखले संगीत छंद वर्ग ह्यांच्या संयुक्त विद्यमाने काल दिनांक ३० जुलै रोजी दापोली तालुक्यातील जालगाव येथील श्रीराम बलवर्धक सभागृह येथे हिंदी – मराठी भावगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दापोली तसेच खेड येथील गोखले सरांचे शिष्य ह्या कार्यक्रमात सहभागी होते.सर्व नवोदित महिला,बालकलाकार व तरुणांना ह्या कार्यक्रमामुळे आपली कला सादर करण्याची संधी मिळाली. कार्यक्रमाला शंभरहून अधिक रसिक मंडळींची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे संगीत संयोजन संगीतकार नीळकंठ गोखले यांनी केले. तबला साथ चैतन्य गोडबोले,ढोलकी साथ निर्मित कदम, झांज डॉ.वैभव लिमये आणि सूत्रसंचालन अस्मिता परांजपे यांनी केले. स्नेहा तोडणकर,सुजाता दाभोळे, काव्या परांजपे, जान्हवी पवार, स्वानंद मोर, आसावरी देवगिरीकर,ग्रिष्मा मराठे,शुभ्रा कांबळे,सुप्रिया रिसबूड,अर्चना नरवणकर, गिरिजा भाटकर,श्रुती शिंदे, मनस्वी सैतवडेकर,रोहन भावे,वीणा कर्वे,सारिका मेहता,अस्मिता परांजपे या कलाकारांनी आपली संगीत सेवा सादर केली.











