अनिरुद्ध कांबळे यांच्या रूपाने लांजा तालुक्याला मिळाले काँग्रेसचे मोठे पद
लांजा (प्रतिनिधी) लांजा तालुक्याचे सुपुत्र अनिरुद्ध कांबळे यांना राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली असून पहिल्यांदा तालुक्याला मोठे पद मिळाल्याने याबद्दल अनिरुद्ध कांबळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अनिरुद्ध कांबळे हे गेले अनेक वर्षे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रामाणिकपणे काम करत आहेत. त्याच्या कामाची दखल घेत पक्ष स्तरावरून अनिरुद्ध कांबळे यांची वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे .वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष पद हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष या पदानंतर दुसरे महत्त्वाचे पद मानले जाते . याची निवड प्रदेश स्तरावरून केली जाते. या पदासाठी संपूर्ण जिल्ह्यातून अनेकजण इच्छुक असताना या वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्षपदी अनिरुद्ध कांबळे यांची वर्णी लागली आहे. वरिष्ठ उपाध्यक्ष हे संपूर्ण जिल्ह्यात हे एकच पद असते आणि लांजा तालुक्याला अनिरुद्ध कांबळे यांच्या रूपाने हे पद मिळाले आहे. त्यामुळे कांबळे यांचे तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकार्यांकडून अभिनंदन करण्यात येत आहे .
दरम्यान आपल्या या पदाचा उपयोग पक्ष संघटना वाढीसाठी करणार असल्याचे अनिरुद्ध कांबळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.










