‘सन्मान सामाजिक सेवेचा’ : लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या पदाधिकाऱ्यांचा नगरपालिकेकडून गौरव

खेड (प्रतिनिधी) : सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावत कोकण प्रांतात अग्रस्थानी स्थान मिळवणाऱ्या ‘लायन्स क्लब ऑफ खेड सिटी’च्या पदाधिकाऱ्यांचा आज, २३ मार्च २०२६ रोजी खेड नगरपालिकेच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. नगराध्यक्षा सौ. माधवीताई बुटाला यांच्या दालनात पार पडलेल्या या कार्यक्रमात विविध सामाजिक उपक्रम राबवून अनेक पुरस्कार मिळवलेल्या लायन्स क्लबच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
या प्रसंगी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर, माजी अध्यक्ष रोहन विचारे, झोन चेअरमन मिलिंद तलाठी, क्लबचे सचिव ओम जाधव यांच्यासह सर्व सभासदांचा नगराध्यक्षांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सामाजिक सेवेचा वसा घेत सातत्याने विविध उपक्रम राबवत खेडवासीयांच्या मनात वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या या संस्थेच्या कार्याचे यावेळी कौतुक करण्यात आले.
या कार्यक्रमास उपनगराध्यक्ष श्री. सतीश चिकणे, गटनेते श्री. निकेतन पाटणे, नगरसेवक श्री. स्वप्निल सैतवडेकर, सभापती श्री. सुनील दरेकर, नगरसेवक श्री. प्रेमळ चिखले, नगरसेवक श्री. मीनार चिखले, नगरसेविका सौ. रसिका खेडेकर यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती.
तसेच लायन्स क्लबचे खजिनदार माणिक लोहार, उपाध्यक्ष अविनाश दळवी, शैलेश धारिया, प्रवीण पवार, डॉ. मरकड, डॉ. वेद तलाठी, नईम चौगुले, सागर करवा आदी सदस्यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली. या सन्मानामुळे लायन्स क्लबच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला असून भविष्यातही अधिक जोमाने सामाजिक कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.