कणकवली : तालुक्यातील कासार्डे पियाळी येथे सामाजिक वनीकरण विभाग सिंधुदुर्ग तसेच राष्ट्रीय हरित सेना विभागामार्फत कणकवली तालुक्यातील कासार्डे पियाळी गावात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी झाडे लावा झाडे जगवा….पर्यावरणाचे रक्षण करा यासह वृक्षसंवर्धन काळाची गरज याबाबत जनजागृती केली.
यावेळी संजय गोविंद ढवण, उपसरपंच विजय नामदेव सावंत, ग्रामपंचायत सदस्य अपर्णा अनिल कावले, संगीता चंद्रकांत पाटील ग्रामसेवक, श्री. इंदुरकर वनक्षेत्रपाल तसेच पियाळी शाळा नंबर चे विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.









