भाजपा लांजा तालुकाध्यक्ष महेश खामकर यांनी घेतली दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट

 

लांजा (प्रतिनिधी) भाजपाचे लांजा तालुकाध्यक्ष आणि रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेश खामकर यांनी दिल्ली येथे केंद्रीय सूक्ष्म लघु उद्योग मंत्री नारायण राणे यांची भेट घेतली.
भाजपा लांजा तालुकाध्यक्ष आणि जिल्हा मध्येच बँकेच्या संचालक महेश खामकर यांच्यासह संचालक रमेश दळवी, रामभाऊ गराटे ,सुरेश कांबळे यांनी दिल्ली येथे केंद्रीय सूक्ष्म लघु उद्योग मंत्री नारायण राणे यांची भेट घेऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले .त्याचप्रमाणे कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांची देखील या ठिकाणी या पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेतली.
यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी तालुकाध्यक्ष महेश खामकर यांना तालुकाध्यक्ष या नात्याने भाजपा पक्षाच्या माध्यमातून तालुक्याचा सर्वांगीण विकास करा. त्यासाठी आवश्यक तो निधी पक्षाच्या माध्यमातून दिला जाईल. पक्ष संघटना तालुक्यात अधिक मजबूत करा असे मार्गदर्शन केले