सामाजिक – राजकीय क्षेत्रात हळहळ.!
कणकवली : शहरातील कनकनगर, ओंकार हाऊसिंग सोसायटी येथील रहिवासी शैलजा शांतीलाल धुमाळे (वय ६२) यांचे मंगळवारी सकाळी कोल्हापूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. प्रकृती खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालवली.
शैलजा धुमाळे या सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत होत्या. त्यांच्या निधनाने कणकवली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, दोन विवाहित मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे.
कणकवली नगरपंचायतीच्या माजी नगरसेविका नंदिनी धुमाळे व कोल्हापूर सी.पी.आर. रुग्णालयातील अधिपरिचारिका रसिका धुमाळे यांच्या त्या मातोश्री होत. तसेच ओरोस जिल्हा रुग्णालयातील परिचारिका चित्रलेखा धुमाळे यांच्या त्या सासूबाई, तर रणजित धुमाळे यांच्या मातोश्री होत. मंगळवारी सायंकाळी कणकवली येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.












