सततच्या आजारपणाने त्रस्त झाल्या सोनिया गांधी

कधी पोटदुखी तर कधी श्वास घेण्यास त्रास होणे तर काही वेळा छातीत दुखणे अशा वेगवेगळ्या कारणांसाठी सोनिया गांधी यांनी मागील वीस वर्षांत वारंवार रुग्णालयात उपचार घेतले आहेत.

सोनिया गांधी यांना मार्च २०२६ च्या आधी जानेवारी २०२६ मध्येही तब्येत बिघडल्यामुळे दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात (एसजीआरएच) दाखल केले होते. याआधी जून २०२५ मध्ये एकदा पोटदुखीसाठी आणि एकदा वैद्यकीय तपासण्यांसाठी असे एकूण दोन वेळा सोनिया गांधी यांना रुग्णालयात दाखल केले होते. फेब्रुवारी २०२५ मध्येही सोनिया यांना रुग्णालयात उपचार घ्यावे लागले होते. कोविड काळात तर सोनिया गांधी यांनी वारंवार वैद्यकीय तपासण्यांसाठी आणि उपचारांसाठी रुग्णालयात दाखल व्हावे लागले होते. अमेरिकेतील रुग्णालयातही सोनिया गांधी उपचार घेतले आहेत. वारंवार रुग्णालयात उपचार घेऊनही सोनिया गांधींच्या तब्येतीच्या कुरबुरी सुरू आहेत.

आणखी शोधा
वृत्तपत्र सदस्यता