डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयामध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

मंडणगड | प्रतिनिधी: शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयामध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची 103 वी पुण्यतिथी व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे 103 वी जयंती साजरी करण्यात आली होती. या निमित्ताने सर्वप्रथम विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. प्रतिभा पाटील यांनी दीप प्रज्वलन करून लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री. सुनील घोसाळकर यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यानंतर श्री. सुनील घोसाळकर यांनी विद्यार्थ्यांना लोकमान्य टिळक यांचे जीवन कार्य व अण्णाभाऊ साठेंच्या जीवनकार्याची माहिती दिली. विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका सौ.योजना शेट्ये यांनीही टिळकांचा व अण्णाभाऊ साठे यांचा जीवनपट विद्यार्थ्यांसमोर उलगडून दाखवला. विद्यालयातील शिक्षक श्री शैलेश खताते यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. संजय अवेरे यांनी केले. शेवटी श्री. किशोर कासारे यांनी राष्ट्रपुरुषांचे जीवन हे प्रेरणादायी आहे. आपण त्यातून प्रेरणा घ्यावी, असे सांगून सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. प्रतिभा पाटील शिक्षक प्रतिनिधी सौ.स्वरा देवघरकर ,सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी सर्वांनी लोकमान्य टिळक व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेली पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.