मंडणगड | प्रतिनिधी : मंडणगड नगरपंचायतीचे सत्ताधारी गटाने 31 जुलै 2023 रोजी राष्ट्रवादी प्रदेश कार्यकारिणीचे अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांची कोलाड सुतारवाडी येथे भेट घेतली. यावेळी नगराध्यक्षा अँड. सोनले बेर्डे, उपनगराध्यक्ष वैभव कोकाटे, नगरसवेक सुभाष सापटे, नगरसेविका प्रियांका लेंडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष मुझफ्फर मुकादम, माजी सभापती भाई पोस्टुरे, अँड.सचिन बेर्डे, सुधीर हातमकर, सतिष दिवेकर, प्रकाश भुवड आदी मान्यवर उपस्थित होते. राज्यातील सत्ताप्रवेशांच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये झालेल्या स्थित्यंतरास एक महिन्याचा कालावधी पुर्ण झाला तरी मंडणगड नगरपंचायतीच्या सत्ताधाऱ्यांनी आपली भुमीका जाहीरपणे स्पष्ट केलेली नाही. या पार्श्वभुमीवर नगरसेवकांनी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांची घेतलेली भेट शहराचे विकासाचे दृष्टीने महत्वाची मानली जात आहे. नगरपंचायतीचे सत्तातरांचे दुसऱ्या पर्वात एक वर्षापुर्वी राज्यात झालेल्या सत्तेतील बदलाचे अत्यंत विपरीत परिणाम झालेले दिसून आलेले आहेत. नगरपंचायतीने महाविकास आघाडीच्या काळात सुचीत केलेली विकास कामे आजही रखडलेली आहेत. त्यामुळे सत्ताधारी विरुध्द विरोधक असा संर्घष कायम पहावयास मिळत आहे. ही बाब लक्षात घेता नगरसेवक व खासदारांची भेट महत्वपुर्ण मानली जात आहे.
नगरपंचायतीची कारभारी खासदार सुनील तटकरे यांच्या मागे उभे राहील्यास सद्यस्थितीत रखडलेली विकासकामे झटकन मार्गी लागणार राहणार आहेत. भेटीचे संदर्भात उपनगराध्यक्ष वैभव कोकाटे यांच्याकडे या विषया संदर्भात प्रतिक्रीया विचारली असता त्यांनी आम्ही विकासा सोबत असून खासदार सुनील तटकेर यांच्या नेतृत्वावर आमचा विश्वास असल्याने आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत असे सांगीतले.
फोटो ओळी- खासदार सुनील तटकरे यांची भेटी प्रसंगी नगराध्यक्षा अँड. सोनले बेर्डे, उपनगाराध्यक्ष वैभव कोकाटे, नगरसवेक सुभाष सापटे, नगरसेविका प्रियांका लेंडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष मुझफ्फर मुकादम, माजी सभापती भाई पोस्टुरे, अँड.सचिन बेर्डे, सुधीर हातमकर, सतिष दिवेकर, प्रकाश भुवड












